तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ श्रीमुदगुलेश्वर शंभुमहादेव मंदीराकडे जाणाऱ्या रस्त्याची मागील अनेक वर्षापासुन प्रचंड दुरावस्था झाली असताना त्याची  शासन दरबारी दखल घेतली जात नसल्याने श्री मुदगुलेश्वर शंभुमहादेव मंदीरात दर्शनार्थ भाविकांची वाट ही बिकट बनली आहे.

तिर्थक्षेञ तुळजापूर च्या पायय्थाशी सिंदफळ शिवारातील घनदाट वनराईत श्री मुदगुलेश्वर शंभुमहादेव मंदीर आहे. येथे पहाटे व राञी भाविक पायी चालत दर्शनार्थ जातात. बार्शी रस्त्यावरून या मंदीराकडे जावे लागते. श्री मुदगुलेश्वर शंभुमहादेव प्रवैशध्दार ते मंदिर हा दीड किलोमीटर रस्ताची प्रचंड दुरावस्था झाली आहे. जागोजाग मोठमोठाले खड्डे पडले आहेत. तसेच सध्या हा रस्ता अरुंद झाल्याने चारचाकी वाहने या  या रस्त्यावरून नेणे कठीण बनले आहे.

तुळजापूर तालुक्यातील नावाजलेले हे मंदिर असुन या स्थळास  हिंदू धर्मिय मोठे श्रध्देने पायी जावुन दर्शन घेतात. त्याच रस्ताच्या  दुरावस्थेकडे होणारे दुर्लक्ष हे हिंदु धर्मियांसाठी वेदना दायी ठरणारे आहे. श्री मुदगुलेश्वर शंभुमहादेव दर्शनार्थ दररोज हजारो भाविक जातात. श्रावणात येथे भाविकांची प्रचंड गर्दी होत असते. या पार्श्वभूमीवर हा रस्ता नियमानुसार मजबुत करुन श्री मुदगुलेश्वर शंभुमहादेव देवाच्या दर्शनाची वाट चालण्या योग्य करुन भक्तांना दिलासा द्यावा व श्रावणमासापुर्वी हे काम पुर्ण करावे.

 
Top