धाराशिव (प्रतिनिधी) - शहरातील शाहूनगर येथील मल्हार प्रशांत साळुंके या विद्यार्थ्याने अबॅकस समर नॅशनल कॉम्पिटशन 2024 अबॅकस लेव्हल झिरोमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

धाराशिव शहरातील लॉजिक प्रोऍक्टिव्ह या क्लासेसमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी सोलापूर येथे प्रोएक्टीव अबॅकस समर नॅशनल कॉम्पेटीशन परीक्षा दिली होती. या परीक्षेत अबॅकस लेव्हल झिरोमध्ये राजलक्ष्मी प्रकाश साळुंके हिने तृतीय तर प्रसन्न रत्नदीप टेकाळे याने चौथा व स्वानंदी प्रसाद माशाळकर हिने पाचवा क्रमांक मिळविला आहे. या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे केंद्रचालक भांडवले यांच्यासह सर्वत्र कौतुक केले जात आहे.

 
Top