तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयात विविध प्रकारची पदे रिक्त असल्याने उर्वरित कर्मचाऱ्यावर कामाचा प्रचंड ताण पडत आहे. धाराशिव तालुक्यातील तेर येथे विविध शासकीय, निमशासकीय कार्यालये आहेत. परंतू या कार्यालयात विविध प्रकारची अधिकारी, कर्मचारी यांची पदे रिक्त आहेत. रिक्त पदाचे ग्रहण केंव्हा संपणार याकडेच तेरकरांचे लक्ष लागले आहे.

तेर येथील महसूल विभागाचे मंडळ अधिकारी पद रिक्त आहे. तर कृषी सहाय्यक यांचेही पद रिक्त आहे. जिल्हा परिषद केंद्रीय शाळा येथील मुख्याध्यापक, सेवक यांचे पद रिक्त असून जिल्हा परिषद उर्दु शाळेतील मुख्याध्यापक यांचेही पद रिक्त आहे. कै.रामलिंगप्पा लामतुरे शासकीय पुराणवस्तू संग्रहालयातील सहाय्यक अभिरक्षक, एक रखवालदार, एक लिपिक पदे रिक्त आहेत. एकात्मिक बालप्रकल्प कार्यालयातील ढोकी ,कोंड, खेड येथील पर्यवेक्षक यांची पदे रिक्त आहेत. तेर येथील आरोग्य उपकेंद्रातील एक आरोग्य सेवक पद रिक्त आहे.तेर येथील विद्युत वितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालयात एक सहाय्यक अभियंता गुणनियंत्रण (शाखा) हे पद रिक्त असून, दोन निम्नस्तर लिपिक, एक उच्चस्तर लिपिक ही पदे रिक्त आहेत. विद्युत वितरण कनिष्ठ अभियंता कार्यालयात एक कनिष्ठ अभियंता हे पद रिक्त आहे. ग्रामीण रूग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक, एक दंत चिकित्सक वर्ग 1 ही पदे रिक्त आहेत.तर फिरते पशु चिकित्सक कार्यालयात एक पशुधन विकास अधिकारी,एक परीचर,एक जीप चालक पदे असून जिल्हा परिषद पशुधन दवाखान्यात पशुधन पर्यवेक्षक एक, परीचर एक पद रिक्त आहे.धाराशिव तालुक्यातील तेर येथील विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयात विविध अधिकारी, कर्मचारी यांची पदे रिक्त असल्याने उर्वरित कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण पडत आहे. तेर येथील विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयातील रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

 
Top