उमरगा (प्रतिनिधी)- उमरगा तालुक्यातील मुरूम येथील नगर शिक्षण विकास मंडळ मुरूम संचलित प्रतिभा निकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मुरूम येथील उपप्राचार्य व  प्राध्यापक सेवानिवृत्ती निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. 32 वर्षांपासून प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले अष्टपैलू उपप्राचार्य अंबर एस.सी, प्राध्यापक मुर्गे एस.एच.व मूर्गे एस.के., चलपते व्ही.बी.यांना निरोप देण्यात आला. 

यावेळी  कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य रोडगे एम.बी., प्रमुख उपसथितीमध्ये उपमुख्याध्याक घुरघुरे यु. एस., प्राध्यापक प्रा.टोपगे के. एम. आदीस प्रतिभा उच्चमाध्यामिक विद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक व आदी मान्यवर उपस्थित होते. सुत्रसंचलन प्रा.ब्याळे के.के. यांनी केले. तर मनोगत प्रा.रामपूरे व  प्रा.पाटील आर.जी. यांनी त्यांच्या आठवणीला उजाळा दिला. आभार सूर्यवंशी ए. एस. यांनी मानले.

 
Top