वाशी (प्रतिनिधी)- श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी संचलित छत्रपती शिवाजी विद्यालय ,वाशी या विद्यालयात एस.एस.सी.(इ 10 वी)  बोर्ड परीक्षा मार्च 2024 मध्ये घवघवीत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. 

याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा मुख्याध्यापिका श्रीमती एस.व्ही.  गाढवे , पर्यवेक्षक बापूसाहेब सावंत , शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष दादासाहेब चेडे, बळीराम जगताप  तसेच सर्व शिक्षक , शिक्षिका , गुणवंत विद्यार्थी व पालक उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. विद्यालयातून प्रथम क्रमांक मिळवणारा मोराळे प्रेमराज लक्ष्मण ( 497 गुण 99.40% ),द्वितीय क्रमांक मिळवणारा अथर्व उमेश चेडे (488 गुण 97.60%)  तर तृतीय क्रमांक मिळवणारी अनुजा शशिकांत फारणे (483 गुण 96.60% ), कवडे श्रावणी रमेश -96.00% ,तुंदारे वैष्णवी परमेश्वर -96.00% ,नाईकवाडी श्रेया सयाजी -95.80% ,साळुंके साक्षी शिवाजी -95.40% ,कवडे मदुरा जयंत -94.60% , विश्वेकर कृष्णा सुशिल -94.20%, कवडे सिध्दांत सुदाम -94.20%  ,कावळे प्रियंका शशिकांत-93.40% ,भालेकर वैभव विलास- 93.20% ,चेडे प्रसाद दादासाहेब -92.40%, जगताप साक्षी समाधान -91.40% ,बुधोडकर सार्थक संतोष-91.20%, जोशी आयुष सुरेश-91.20% ,क्षिरसागर प्रज्वल हनुमंत-91.20% ,शिंदे वैष्णवी लक्ष्मण -90.40%, शेरकर अदिती अरूण- 90.40%, जगताप प्रियंका सोमनाथ-90.20% या गुणवंताचा सत्कार करण्यात आला. 

याप्रसंगी गुणवंत विद्यार्थी , शिक्षक तसेच बळीराम जगताप, दादासाहेब चेडे ,बापूसाहेब सावंत, घुमरे डी. के. यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर अध्यक्षीय समारोप श्रीमती एस. व्ही.गाढवे यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीधर धारकर .यांनी तर आभार क्षीरसागर एस.व्ही.यांनी मानले.

 
Top