धाराशिव  (प्रतिनिधी)-  कळंब शहरातील श्वेता सुंदर कदम हिने एमपीएससी स्पर्धा परिक्षेत यश संपादन केल्यामुळे तिची वनीकरण विभागात वनरक्षकपदी निवड झाली आहे. त्याबद्दल तिचा कळंब येथे तिच्या घरी जावून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी वडील सुंदर कदम, आई छायाताई सुंदर कदम, राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष सुरेश टेकाळे, शहराध्यक्ष मुसेद्दीक काझी, उद्योग सेलचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल माने आदी उपस्थित होते. श्वेता कदम हिने एमएस्सी फिजिक्स पुर्ण केल्यानंतर ही परिक्षा दिली होती. त्यामध्ये हे यश संपादन केले असून 13 मार्च रोजी ती सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा येथे सेवेत रुजू झाली आहे.

 
Top