धाराशिव (प्रतिनिधी) - अखिल भारतीय बहुजन ओबीसी अल्पसंख्यांक भ्रष्टाचार निर्मूलन असोसिएशन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी स्नेहा सुरेश क्षीरसागर यांची निवड करण्यात आली आहे. सदरील निवड ही अखिल भारतीय बहुजन ओबीसी अल्पसंख्याक भ्रष्टाचार निर्मूलन असोसिएशनचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सय्यद कलीम मुसा यांनी स्नेहा क्षीरसागर यांना नियुक्तीपत्र देवून केली आहे. यावेळी जिल्हा संघटक मुस्ताक तांबोळी, जिल्हा सहसचिव विकी ओव्हाळ, भाग्यश्री गाढवे, माधुरी पवार, अंजली शितोळे, स्नेहा क्षीरसागर, नीता शितोळे व अलका मगर आदी उपस्थित होते.

 
Top