तुळजापूर  (प्रतिनिधी)-  तिर्थक्षेञ तुळजापूर येथील  श्रीतुळजाभवानी मंदीर,परिसरातील मंकावती गल्लीत बसवण्यात आलेले पेव्हरब्लाँक उखडल्याने याचा ञास यावरुन मार्गक्रमण करणाऱ्या भाविक, स्थानिकांना होत आहे. निखळलेले पेव्हरब्लाँक व्यवस्थित बसवुन घेण्याची मागणी मंकावती गल्लीतील रहिवाशी करीत आहे.

सध्या पावसाळा असल्याने निखळलेल्या पेव्हरब्लाँक खच मध्ये पाणी थांबत असल्याने पाय ठेवताच त्या खची मधुन पाण्याचे फवारे उडुन पादचा-यांचे कपडे घाण होत आहेत. काही ठिकाणचे पेव्हरब्लाँक उखडुन निघाले असुन यावर पाय पडताच काहीचे पाय मुरगळुन दुखापत होत आहे. सदरील पेव्हरब्लाँक हा सोयीसाठी ऐवजी गैरसोयिचे बनल्याने नगरपरिषद याकडे जातीने लक्ष देवुन योग्य ती उपाययोजना तात्काळ करण्याची मागणी  रहिवाशांमधुन केली जात आहे.


वैतागलेल्या रहिवाशींनी स्वताच केली दुरुस्ती

उखडलेल्या पेव्हरब्लाँकला वैतागल्याला रहिवाशांनी स्वता खर्च करुन ते बसवुन या त्रासातुन मुक्ती घेतली असली तरी उर्वरीत भागात माञ भाविक, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. 

 
Top