कळंब (प्रतिनिधी)- येथील कळंब तालुका मेडिकल प्रॅक्टिसनर्स असोसिएशन च्या वतीने विविध स्पर्धा स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या डॉक्टर्स पाल्यांचा सत्कार आय एम ए चे माजी प्रदेशाध्यक्ष डॉ रामकृष्ण लोंढे यांच्या हस्ते व संघटनेचे अध्यक्ष डॉ राजेंद्र गोरे, सचिव डॉ अभय मनगिरे, डॉ गिरीश कुलकर्णी, डॉ संतोष काकडे, डॉ सचिन पवार, डॉ अभिजित जाधवर डॉ रमेश जाधवर, डॉ शरद दशरथ , डॉ रमाकांत कल्याणकर, डॉ काकानी, अमित पाटील, डॉ पठाण,डॉ विवेक शिंदे, डॉ अंबिका, डॉ राजेंद्र बावळे ई मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवार दि 28 रोजी करण्यात आला. 

या सत्कार मुर्ती मध्ये अभिराज अभय मनगिरे, सत्यम अनिल शिनगारे, वरद शैलेश बिदादा, सोहम सुनील थळकरी, अश्विन महाकुंडे, यश पाटील, जय शरद दशरथ, संदेश लक्ष्मीकांत कस्तुरकर यांचा समावेश आहे. 

यावेळी डॉ रामकृष्ण लोंढे यांनी ' नीट परिक्षेतील ' घोटाळ्याची सविस्तर माहिती दिली. यामध्ये पेपर फुटी प्रकरणात असंख्य पुरावे तपास यंत्रणेने च्या हाती लागले असुन याचे लोण संपूर्ण देशात पसरले असल्या चे निदर्शनास आणून दिले. या मुळे ही परिक्षा ताबडतोब रद्द करून नव्याने घेण्यात यावी . जेणेकरून हुषार व होतकरू गुणवंत विद्यार्थ्यांना न्याय मिळेल असे म्हटले. 

डॉ लोंढे  यांनी गुणवत्ता फुगवट्याबधल ( मेरीट ईन्फ्लेशन) उदाहरण देऊन सांगितले की गेल्या वर्षी 2023 मध्ये 720 ते 620 गुण प्राप्त विद्यार्थ्यांची आल इंडिया रँक 14000 चे आसपास होती मात्र या वर्षी 2024 मध्ये हीच रँक 58000 पर्यंत वाढली असून त्यामध्ये तब्बल चार पटीने वाढ झालेली आहे जे की अशक्यप्राय आहे.  त्यानंतर च्या मेरीट लीस्ट मध्ये एवढा मोठा फरक दिसून येत नाही. गेल्या वर्षी 620 ते 520 गुण प्राप्त विद्यार्थ्यांचे मेरीट रँक 91000 चे आसपास होते. या वर्षी वाढून 1,01,500 च्या जवळ आले आहे जे की तर्कसंगत आहे. यात केवळ 11500 ची वाढ दिसून येते. त्यानंतरच्या मेरीट रँक मध्ये फारसा फरक दिसून येत नाही. 

यामागचे कारण शोधले असता असे दिसते की देशात एम बी बी एस च्या एकुण जागा 1,09,000 असून त्यापैकी 56000 जागा शासकीय मेडिकल कॉलेज मध्ये भरल्या जातात व बाकीच्या खाजगी मेडिकल कॉलेज मध्ये भरल्या जातात. सरकारी कॉलेज ची संपूर्ण कोर्स ची फीस 3.5 ते 6.5 लाख रुपये आहे. खाजगी कॉलेज ची फीस 70 ते 80 लाख रुपये असुन डीम्ड विद्यापीठा अंतर्गत कॉलेज ची फीस 1.2 कोटी च्या आसपास आहे. या नीट परिक्षेच्या निकालाचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की 720 ते 620 गुण प्राप्त विद्यार्थ्यांच्या च मेरीट रँक मध्ये छेडछाड केली असून चार पटीने विद्यार्थी संख्या वाढवली आहे ( गैरमार्गाने विद्यार्थी घुसवले आहेत)  आणि केवळ  हेच विद्यार्थी पुढे सरकारी मेडिकल कॉलेज चे लाभार्थी ठरू शकतात. हे काम खूप विचार पुर्वक केले असून फार वरपर्यंत याचे धागे दोरे गेलेले दिसतात. 

या परीक्षा पेपर फुटी मध्ये भरपूर प्रमाणात अनियमितता असुन जनतेमध्ये, विद्यार्थ्यां मध्ये, पालका मध्ये प्रचंड असंतोष दिसून येतो. विद्यार्थी रस्त्यावर उतरले असुन देशाच्या विविध भागात मोर्चा व आंदोलन केले जात आहे. हा मुद्दा विधानसभा व लोकसभेत ही उठविला जाऊ लागला आहे. या वरून लोकसभेचे कामकाज ठप्प झाले आहे. या संदर्भात केंद्र शासनाने पावले उचलली असुन सार्वजनिक परिक्षा अधिनियम 2024 संदर्भात आदेश जारी केला आहे. महाराष्ट्र सरकारने नीट चा तपास सीबीआय कडे सोपविला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने तपासास गती दिली आहे. दोषी वर कडक कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले असून या संदर्भात जनते कडून विविध सुचना, हरकती त्यांच्या संकेत स्थळावर  ( neet@nta.ac.in ) दि 6 जुलै पर्यंत मागविल्या आहेत. या संदर्भात जास्तीत जास्त सुचना/ हरकती पाठवाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे. या संदर्भात आदरणीय राष्ट्रपती महोदयांनी केंद्र सरकार ला तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. सुप्रीम कोर्टात येत्या 8 जुलै ला सर्वोच्च सुनावणी होणार आहे. सर्वांचे लक्ष सर्वोच्च न्यायालयकडे लागले असुन 24 लाख विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे. या संपूर्ण घडामोडी पाहता सद्या ची नीट परिक्षा तातडीने रद्द करून नव्याने लवकरात लवकर चार ते सहा आठवड्यात घ्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.


 
Top