तुळजापूर (प्रतिनिधी)- लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी उमेदवार निवडुन आणायाचे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी तुळजापूर येथे आयोजित तालुकास्तरीय आढावा बैठकीत केले. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे जेष्ट नेते जीवनराव गोरे होते.

प्रारंभी कार्यकत्याचे मनोगत ऐकून घेण्यात आले. यावेळी तुळजापूर विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे घ्यावा असे कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त केली. यावेळी बोलताना सलगर म्हणाल्या की, महाविकास आघाडीला मतदारांनी लोकसभेला साथ दिल्याने त्यांचे आम्ही जाहीर आभार मानतो. असे स्पष्ट  करुन या पुढे येथे महाविकास आघाडी उमेदवार  निवडुन आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट  केले.  तुळजापूर विधानसभेची जागा आपल्या कडे घेण्यासाठी प्रयत्न करु असे आश्वासन यावेळी दिले. 

यावेळी बोलताना जीवन गोरे म्हणाले कि, महाराष्ट्रात मा शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग आहे. पक्षसोडुन गेले किती याचा विचार न करता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन यावेळी केले. या बैठकीस माजी सभापती उत्तम लोमटे, माजी  सभापती  दिगंबर खराडे, बापू नवगिरे, खरेदी-विक्री संघाचे उपसभापती संजय धुरगुडे, अनिल शिंदे, दिलीप मगर, खंडू जाधव, अक्षय परमेश्वर, युवक तालुकाध्यक्ष शरद जगदाळे, गणेश नन्नवरे, संजय मोठे, विद्याधर लोखंडे, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव जाधव, केमवाडीचे माजी सरपंच बाबासाहेब काशीद, ज्येष्ठाचे तालुकाध्यक्ष शिंद गावचे चांद  सह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकते मोठ्या संखेने उपस्थितीत होते.

 
Top