धाराशिव (प्रतिनिधी) -अंत्यत प्रतिकूल परिस्थितीमध्ये कळंब शहरातील विद्याभवन हायस्कूलची अलसबा रईस रामपुरे हिने दहावी बोर्ड परिक्षेत 100 टक्के गुण घेवून जिल्ह्यात प्रथम आली आहे. त्याबद्दल तिचा कळंब येथील तांदुळवाडी रस्त्यावरील तिच्या घरी जावून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी आजोबा रहेमान शेख, आई झहीराबी रामपुरे, आजी यांच्यासह संपुर्ण परिवाराचा सत्कार करण्यात आला. मुलीने अभ्यासात ठेवलेले सातत्य, आई व आजोबाने घेतलेली मेहनत व शाळेतून केलेले मार्गदर्शन यामुळे मला यश मिळाल्याचे अलसबा हिने सांगितले. याप्रसंगी दुधगावकर यांनी जिल्ह्यात प्रथम आलेल्या अलसबा हिचा सर्वांना अभिमान असल्याचे सांगितले. यावेळी राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष सुरेश टेकाळे, शहराध्यक्ष मुसेद्दीक काझी, उद्योग सेलचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल माने, सुंदर कदम आदी उपस्थित होते.

 
Top