परंडा (प्रतिनिधी) - परंडा बसस्थानक येथे रा.प.महामंडळाचा 76 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 76 वा वर्धापन दिनानिमित्त परंडा बसस्थानकात प्रवाशांचे रा.प.परंडा आगार प्रमुख उल्हास शिनगारे यांच्या उपस्थितीत गुलाब पुष्प व पेढे वाटप करून  स्वागत करण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयाचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अबरार पठाण व प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष किरण शहा यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी वाहतूक निरीक्षक गोरख खराटे, वाहतूक नियंत्रक अ.अ.हुसेनी, शिवलकर, बसस्थानक नियंञक संजय कदम, जुल्फिकार जिनेरी, कासीम मुलाणी, राजाभाऊ घोगरे, दिपक चैतन्य, नवनाथ नलवडे, उमेश पालके आदी कर्मचारी उपस्थित होते. स्वच्छता व सजावट करण्यासाठी अंकुश धुर्वे, तुकाराम थिटे व सविता शिंदे यांनी परिश्रम घेतले.

 
Top