वाशी (प्रतिनिधी)- तालुक्यातील सारोळा (मां) येथील 35 वर्षीय शेतकऱ्याने नापिकीला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना दि. 22 जून रोजी सकाळी उघडकीस आली.

सारोळा (मां) येथील मेघराज शेषेराव मोरे हे मागील वर्षाच्या दुष्काळामुळे उत्पन्न मिळाले नसल्याने यावर्षी पेरणी कशी करावी या चिंतेत होते. त्यातच त्यांनी उसनवारी करून पेरणी केली होती. बँकेचे पीककर्ज कसे फेडावे या चिंतेत होते. शुक्रवारी रात्री उशिरा ते घराबाहेर गेल्यावर ते सकाळी घरी परतलेच नाहीत. त्यांनी नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून रामहरी मोरे यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला साडीच्या सहाय्याने गळफाळ घेत आत्महत्या केली. 


 
Top