परंडा (प्रतिनिधी) -भारत देशाचे कणखर, शक्तिशाली नेतृत्व नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा दि.9 जून 2024 रोजी सायं 7.15 वा. पंतप्रधानपदाची शपथ घेतली. परंडा तालुक्यातील व शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एकमेकांना पेढे भरवुन फटाके फोडून मोठा जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष ॲड.गणेश खरसडे, जिल्हा सरचिटणीस विकास कुलकर्णी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. जहिर चौधरी,  आर.पी.आय (आठवले) प्रदेश चिटणीस संजयकुमार बनसोडे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अरविंद रगडे, ॲड.संदिप शेळके, धनंजय गायकवाड, परसराम कोळी, साहेबराव पाडुळे, सुजित परदेशी, बाबासाहेब जाधव, विलास खोसरे, सारंग घोगरे, विजय बनसोडे, उमाकांत गोरे, डॉ. अमोल गोफणे, धनंजय काळे, मिलिंद शिंदे, गौरव पाटील, मनोज पवार, सुरज काळे, आदर्श ठाकूर, राहुल फले, नागेश गर्जे तसेच इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top