धाराशिव (प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर कर्मचारी महामंडळाच्या धाराशिव जिल्हा अध्यक्षपदी विश्वनाथ दहिफळे यांची निवड करण्यात आली आहे.

धाराशिव जिल्हा खाजगी माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षकेत्तर सेवक संघ धाराशिव ची सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक 08 जून 2024 रोजी श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,धाराशिव येथे संपन्न झाली. सर्व साधारण सभेसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षकेत्तर महामंडळाचे सरकार्यवाह शिवाजीराव खांडेकर, राज्य महामंडळाचे उपाध्यक्ष खैरूददीन सय्यद तसेच छत्रपती संभाजीनगर विभागीय कार्यवाह संजय कावळे हे उपस्थित होते. संघटनेच्या रिक्त असलेल्या धाराशिव जिल्हा अध्यक्षपदी श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे वरीष्ठ लिपीक विश्वनाथ सोपानराव दहिफळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सुचक दिनेश मिरजे व अनुमोदक पवार श्रीमंत हे होते. जिल्हा संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबददल विश्वनाथ दहिफळे यांचा महामंडळाचे सरकार्यवाह शिवाजीराव खांडेकर सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सर्वसाधारण सभेस संघटनेचे सर्व पदाधिकारी व विविध विद्यालयाचे शिक्षकेत्तर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. या निवडीबद्दल विश्वनाथ दहीफळे यांचे अभिनंदन आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील,  संस्थेच्या सरचिटणीस  सौ.प्रेमाताई पाटील, प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील, प्राचार्य तथा मुख्याध्यापक नंदकुमार नन्नवरे, उपप्राचार्य संतोष घार्गे, सर्व पर्यवेक्षक वृंद तसेच शिक्षक शिक्षकेत्तर यांनी केले आहे.

 
Top