परंडा (प्रतिनिधी) -शहरात वारंवार होत असलेला खंडीत विद्युत पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी शहरातील नागरिकांच्यावतीने उपकार्यकारी अभियंता महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी समोर धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी शाखा अभियंता संजीव रोकडे यांना निवेदन देण्यात आले आहे. शहरांमध्ये सतत विद्युत पुरवठा खंडित केला जात असल्याने नागरिक खूप त्रस्त झालेली आहेत. नागरिकांनी वारंवार संबंधित अधिकारी यांच्या समवेत संपर्क साधून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी उपयोजना कराव्यात अशा अनेक तक्रारी देण्यात आल्या आहेत. दोन दिवसात विद्युत पुरवठा सुरुळीत न झाल्यास उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर माजी नगरसेवक इरफान शेख, आधार सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष झुल्फिकार काझी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे,माजी नगरसेवक डॉ अब्बास मुजावर, माजी नगराध्यक्ष बाशा शहा बर्फिवाले, ज्येष्ठ नागरीक लाडलेसाहेब मोरवे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 
Top