धाराशिव (प्रतिनिधी)-शिवराज्याभिषेक रिक्षा समिती धाराशिव व धाराशिव शहरातील समस्त ऑटो रिक्षा चालक-मालक यांच्या वतीने आज शुक्रवार दिनांक 28 जून 2024 रोजी सकाळी ठीक 11 वाजता मध्यवर्ती बसस्थानक धाराशिव येथून शेकडो प्रवासी परवानाधारक ऑटो रिक्षा चालक मालक यांनी आपल्या ऑटोरिक्षासह विविध मागण्यांसाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी धाराशिव, पोलीस अधीक्षक धाराशिव, जिल्हाधिकारी धाराशिव यांना निवेदन देण्यात आलेले आहे. 

यामध्ये ऑटोरिक्षा चालक मालक यांच्या प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे होत्या  बजाज कंपनीने व इतर कंपन्यांनी इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा ई रिक्षा बाजारात आणलेल्या आहेत. त्यांना प्रवासी वाहतूक परवाना तसेच बॅच हा शासनाने पुरविलेला नाही. या इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा बेकायदेशीररित्या व विनापरवाना प्रवासी वाहतूक करत आहेत. या विनापरवाना प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटोरिक्षांची नोंदणी करण्यात येऊ नये. तसेच धाराशिव शहरांमध्ये विना प्रवासी वाहतूक परवाना नसलेल्या तसेच विना कागदपत्र असलेल्या अनेक अवैध रिक्षा प्रवासी वाहतूक करत आहेत त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करून त्या स्क्रॅप करण्यात याव्यात. तसेच जे परवानाधारक ऑटोरिक्षांची नूतनीकरण केलेले नाहीत त्यांचे नूतनीकरण विनादंड करण्यात यावे. धाराशिव शहरात ऑटो रिक्षांसाठी रिक्षा स्टॉप साठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी. फुटपाथ व रस्त्यावर अडथळा येणारे बेकायदेशीर अतिक्रमण हटवावे. या मागण्यांसाठी सर्व प्रवासी परवानाधारक ऑटोरिक्षा चालक-मालक हे अत्यंत आक्रमक झालेले दिसून आले. 

यावेळी ऑटो रिक्षा चालक योगेश आतकरे यांनी असे म्हटले की“ जर इलेक्ट्रिक ऑटोरिक्षा व विना कागदपत्र ऑटोरिक्षा रस्त्यावर प्रवासी वाहतूक करत असतील तर तो सर्व परवानाधारक ऑटो रिक्षा चालकावर मालकांवर फार मोठा अन्याय होत आहे. या विरोधात आवाज उठवण्यासाठी सर्व ऑटो रिक्षा चालक-मालक आगामी काळात मोठ्या संघर्षासाठी तयार आहेत.सुशिक्षित बेरोजगारांचे जगण्याचे साधन ऑटो रिक्षा हेच असताना विनापरवाना इलेक्ट्रिक रिक्षा व विना पास प्रवासी परवाना नसलेले तसेच कागदपत्र नसलेले ऑटो रिक्षा शहरात धावत असताना शासन त्याकडे डोळेझाक करत आहे.जर शासनाने व आरटीओ विभागाने यावर कारवाई नाही केली तर आगामी काळात तीव्र असे मोठे आंदोलन उभारण्यात येणार आहे. आंदोलकांच्या वतीने दिनांक 12 जुलै पर्यंत ची डेडलाईन देण्यात आलेली आहे. जर तोपर्यंत प्रवासी परवानाधारक ऑटो रिक्षा चालक मालकांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर बेमुदत रिक्षा बंद चे आंदोलन छेडण्यात येईल त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील असे निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे. 

यावेळी शिवराज्याभिषेक रिक्षा समितीचे  उपाध्यक्ष अजिंक्य तनमोर, सचिव व्यंकटेश पडिले, कार्याध्यक्ष योगेश आतकरे, फिरोज पठाण, संजय कांबळे, सतीश मोहिते, अनिल सूर्यवंशी, रिजवान पठाण, जलील शेख, बालाजी चंदनशिवे, बालाजी शिंदे, बजरंग पवार, राजू पठाण, महबूब शेख, दादा घोरपडे, किरण खैरे, बालाजी खैरे, मिलिंद वीर, शकील शेख, राजू शेख, मोहन लांडगे, चंद्रकांत वाडकर, राहुल वाघमारे, नवे खैरे, सुरज नाईकवाडी, राम शेंडगे, बालाजी घुगे, इरफान तांबोळी, अण्णासाहेब एडके, रज्जाक शेख, संकेत हाजगुडे, शिवलिंग स्वामी यांचेसह शेकडो ऑटो रिक्षा चालक-मालक उपस्थित होते.


 
Top