तुळजापूर (प्रतिनिधी)- महायुतीची सर्वाधिक ताकद असलेल्या  तुळजापूर विधानसभा मतदार संघातुन महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना मताधिक्य मिळाल्याने ओमराजे धाराशिव लोकसभा मतदार संघातुन महाविकास आघाडीला पुनश्च दणदणीत विजय मिळवता आला.

तुळजापूर विधानसभा मतदार संघात महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्रीतुळजाभवानी मातेच्या वास्तव्याने पुनित झालेले तिर्थक्षेञ तुळजापूर येते. या मतदार संघातील मतदारांना काहीही नको असते पण लोकप्रतिनीधी आपल्या सुखादुखात सहभागी होणारा, आपल्याशी संवाद साधणारा हवा असतो. ऐवडीच त्याची माफक अपेक्षा असते. ती अपेक्षा ओमराजे निबाळकर यांच्या फोनध्दारे संपर्काने पुर्ण  केल्याने मतदार हा शेवटपर्यत महाविकास आघाडीच्या पाठीशी  राहिल्याचे दिसुन आले.

या निवडणुकीत तालुक्यात नेते ऐकीकडे तर कार्यकर्ते, मतदार ऐकीकडे अशी चर्चा होती. ती प्रत्यक्षात सत्यत उतरल्याचे दिसुन आले. ठेकेदार कार्यकर्त्याचा प्रचार मतदारांनी नाकारल्याचे दिसुन आले. तुळजापूर विधानसभा मतदार संघ भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा असुन त्यांनी आपल्या या मतदार संघात चांगली बांधणी करुन भाजप बालेकिल्ला बनवला आहे. याही मतदार संघातुन महाविकास आघाडीला मताधिक्य मिळाल्याने आगामी विधानसभा निवडणुक पार्श्वभूमीवर राजकिय समीकरणे बदलण्याचे संकेत मिळाले आहेत.

तुळजापूर  विधानसभा मतदार संघात सर्वाधिक  65..40 टक्के मतदान झाले आहे. तुळजापूर विधानसभा मतदार संघात एकुण 375562 मतदार असुन त्यापैकी पुरुष 198517 पैकी 134001 (67.50 टक्के) तर  स्ञी 177039 पैकी (63.05 टक्के ) मतदान केले आहे.

भाजपचा बालेकिल्ला म्हणून तुळजापूर विधानसभा मतदार संघ उदयास येत आहे.  त्यामुळे भाजपला या तालुक्यातून मताधिक्य निश्चित मिळेल असा राजकिय अंदाज होता तो फोल ठरला आहे. युवा नेते सुनिल चव्हाण यांंच्या काँग्रेस मधुन भाजप प्रवेशा झाला तरीही महाविकास आघाडीला मिळालेले मताधिक्य हे विशेष आहे.

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या  सौभाग्यवती जि. प. उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनातालुक्याच्या विधानसभेच्या या मतदारसंघाकडून मोठे मताधिक्य मिळण्याची  अपेक्षा होती ती फोल ठरल्याने ही बाब भाजपला  चिंतन मंथन करावी लागणारी ठरणार आहे.  कारण हे होम ग्राऊंड आहे पंचायत समिती नगरपरिषद कृषीउत्पन्नबाजारसमिती  सह सहकार क्षेत्र  भाजप ताब्यात आहेत. महायुतीच्या विजयाचे गणित  तुळजापूर विधानसभा मतदार संघाने बिघडविल्याची चर्चा आता होत आहे. मराठा, मुर्स्लीम, दलित मतदार महाविकासआघाडी जातील हा अंदाज तंतोतत खरा ठरल्याचे बोलले जाते महाविकासआघाडीच्या  ओबीसी कार्यकत्यांन मुळे ओबीसी मते ही  महाविकासआघाडी ला मिळाल्याचे दिसुन आले  लिंगायत ब्राम्हण  समाज महायुती कडे गेल्याचे दिसुन आले. वंचित सह,अन्य उमेदवारांचा  अपेक्षित प्रभाव मतदारांन वर पडला नसल्याचे दिसुन आले याचा लाभ निंबाळकरांना झाला  आहे.

या निवडणुकीत जात व शेतकरी फँक्टर चालल्याचे  दिसुन येते. या निवडणुकीत  विरोधक एकसंघपणे प्रचारात उतरून प्रामाणिकपणे काम केल्याने विरोधकांची प्रचार यंञणा  मतदान प्रक्रिया पर्यत तोडीस तोड कार्यान्वित राहिल्याचे दिसुन आले. याचा विजयात मोठा वाटा राहिला.

.  

धाराशिव लोकसभेवर अखेर बाळासाहेबांचा भगवा फडकला !

स्ञी शक्तीदेवता श्रीतुळजाभवानी मातेच्या वास्तव्याने  पुण्यपावन झालेला  तुळजापूर विधानसभा मतदार संघ अखेर शिवसेनाउबाठा  यांच्या  पाठीशी राहिल्याने  शिवसेना प्रमुख कै बाळासाहेब ठाकरे यांचे तिर्थक्षेञ तुळजापूर विधानसभा मतदार संघवर भगवा फडकण्याचे स्वप्न,पुर्ण झाले. धाराशिववर पुनश्च भगवा फडकवुन जिल्हा बाळासाहेबांचाच हे सिध्द झाल्याची प्रतिक्रिया विजयानंतर शिवसैनिकांनी दिली.


ओमराजेंच्या  शुभेच्छाचे  बँनर मतमोजणी अगोदर झळकले

खासदार  ओमराजे निंबाळकर यांच्या  विजयाचे बँनर मतमोजणी पुर्वीचे लावले गेले होते. यावरुन विजयाचा आत्मविश्वास महाविकासआघाडी  कार्यकर्त्यांकडे प्रचंड होता हे दिसुन आले.

 
Top