भूम (प्रतिनिधी)- भूमिपुत्र डॉ.राहुल भिमराव घुले यांच्यावतीने वाशी येथे आठवडी बाजाराचे औचित्य साधून जेष्ठ नागरिकांना मोफत आधाराच्या काठीचे वाटप करण्यात आले. 

भूम, परांडा, वाशी तालुक्यातील जेष्ठ नागरिकांना चालण्यासाठी आधार मिळावा यासाठी डॉ.राहुल घुले यांच्या वतीने मागील दोन महिन्यापासून मोफत काठी वाटप करण्यात येत आहे. भूमिपुत्र डॉ.राहुल भिमराव घुले मित्र परिवाराच्या माध्यमातून “जेष्ठांसाठी आधाराची काठी “ या उपक्रमा अंतर्गत जेष्ठ नागरिकांना मोफत काठ्यांचे वाटप करण्यात येत आहे. 73 जेष्ठ नागरिकांना मान्यवरांच्या हस्ते काठ्यांचे वाटप करण्यात आले. वाशी तालुक्यात आजगतायत 2 हजारापेक्षा जास्त काठ्यांचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी सचिन जाधवर, मनीषा चौधरी यांच्यासह अन्य मान्यवर व तालुक्यातील सर्व जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

 
Top