भूम (प्रतिनिधी)- दुचाकीच्या अपघातात दोघे गंभीर झाल्याची घटना दि. 16 जून रोजी दुपारी साडेचारच्या दरम्यान वाशी रोडवरील सोनगिरी जवळच्या तलावाजवळ घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बाळासाहेब शिंदे वय 45 रा. करमाळा व विजय विठ्ठल चव्हाण विजोरा हे दुचाकीवरुन सरमकुंडी फाट्याकडे जात असताना दुपारी साडेचारच्या दरम्यान सोनगिरी जवळील तलावाजवळ दुचाकी स्लिप झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक अंदाज आहे. अपघात होताच जखमीना भूम येथील ग्रामिण रुग्नालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दोघेही गंभिर जखमी असल्याने त्यांच्यावर वैद्यकिय अधिकारी डॉ. भोरे यांनी उपचार करुन त्यांना पुढिल उपचारासाठी धाराशीव येथे पाठविण्यात आल्याचे उपचार करणाऱ्या डॉव्टर यांनी सांगीतले. सध्या या रस्त्याचे काम सुरु असून रस्त्यावरील खडीमुळे गाडी स्लिप झाल्याचे घटनास्थळी असलेल्या नागरिकांचे म्हणने आहे.

 
Top