भूम (प्रतिनिधी)- आताच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख व महाविकास आघाडीला महाराष्ट्र मध्ये भरघोस यश मिळाले. भूम -परंडा - वाशी तालुक्यातून खासदार ओमराजे निंबाळकर यांना विक्रमी मताची लीड देऊन ऐतिहासिक विजय मिळवून दिला. सर्वांचे आभार मानले. येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये असेच कार्य करून येथील विधानसभा निवडणूकीत गद्दारांना हटवण्यासाठी कायम विक्रमी मताचे लीड राखावी असे आवाहन धाराशिव जिल्हा संपर्कप्रमुख सुनील काटमोरे यांनी केले आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघातून खासदार ओमराजे निंबाळकर यांना 81 हजाराची लीड देऊन येथील गद्दारांचे पानिपत केले.  हा मेसेज उद्धव ठाकरे पर्यंत पोहोचला असल्यामुळे तालुका शिवसेना कार्यालयामध्ये भूम परंडा वाशी तालुक्यातील पदाधिकारी यांनी संपर्क प्रमुख सुनिल काटमोरे यांचा सत्कार केला. 

भूम येथे शिवसेना तालुका संपर्क कार्यालयामध्ये भूम परंडा -वाशी तिन्ही तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांची पाठ थोपटली. यावेळी शिवसेना वाशी तालुकाप्रमुख विकास मोळवणे, परंडा तालुकाप्रमुख मेघराज पाटील, भूम तालुकाप्रमुख ॲड. श्रीनिवास जाधवर, विधानसभा प्रमुख समन्वयक दिलीप शाळू, विधानसभा प्रमुख प्रल्हाद आडागळे,भूम शहर प्रमुख प्रकाश ठाकरे, उपशहर प्रमुख सरफराज कुरेशी, माजी शहर प्रमुख दीपक मुळे, उप तालुका प्रमुख रामभाऊ नाईकवाडी, ॲड. विनायक नाईकवाडी, विहंग कदम, बाळासाहेब गुळमे, बार्शी उपतालुकाप्रमुख बाळासाहेब नाईकवाडी, कोहिनूर सय्यद यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top