भूम (प्रतिनिधी)- देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्रजी मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ ग्रहण केल्याचा आनंद उत्सव भूम तालुका भारतीय जनता पार्टीच्यावतीने फटाक्याची आतिषबाजी करत, घोषणा बाजी करत गोलाई चौक येथे आनंदोत्सव साजरा केला.

रविवार दिनांक 9 जून 2024 रोजी हिंदुस्तानचे  पंतप्रधान म्हणून नरेंद्रजी मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ ग्रहण करून हॅट्रिक केली.  याचा आनंद उत्सव भूम तालुका भारतीय जनता पार्टीच्यावतीने भूम येथे साजरा केला. या निमित्ताने भाजप कार्यालय येथून पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी विजय रॅली गोलाईपर्यंत काढली. गोलाई येथे आल्यानंतर सर्वांनी नरेंद्रमोदी तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है,  देश का नेता कैसा हो,  नरेंद्र मोदी जैसा हो,  भारतीय जनता पार्टीचा विजय असो,  वंदे मातरम,  भारतीय जनता पार्टीचा विजय असो,  भारत माता की जय,  छत्रपती शिवाजी महाराज की जय , अशा प्रकारच्या घोषणा देत फटाक्यांची तब्बल एक तास आतिषबाजी करून,  घोषणाबाजी करत नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

यावेळी 400 मोतीचूर लाडू आनंदाच्या भरात सर्वांनी एकमेकाला आणि नागरिकांना भरवत आनंद व्यक्त केला.  यावेळी भारतीय जनता पार्टीचे भूम परंडा वाशी विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, तालुका अध्यक्ष महादेव वडेकर, जिल्हा उपाध्यक्ष सुदाम पाटील, तालुका सरचिटणीस संतोष सुपेकर,  गजेंद्र धर्माधिकारी, हेमंत देशमुख,  प्रदीप साठे, शहराध्यक्ष बाबासाहेब वीर, संतोष ओताडे, अश्विनी साठे,  मुकुंद वाघमारे, शांतीराज बोराडे, विधीज्ञ संजय शाळू, चंद्रकांत गवळी, मारुती चोबे, सुजित वेदपाठक, अमोल लोंढे उपस्थित होते.

 
Top