भूम (प्रतिनिधी)-आजारी महिलेस उपचारासाठी बार्शी  येथील खाजगी दवाखान्यात घेऊन जात असलेल्या क्रुझर जीपच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटुन झालेल्या अपघातात आजारी महिलेसोबत जात असलेल्या एका महिलेचा मृत्यु झाला. तर अन्य तीघेजण जखमी झाल्याची घटना सोलापुर - धुळे राष्ट्रीय महामार्गावरील पार्डी फाटा येथे दि. 8 जून रोजी राञी आठ वाजण्याच्या सुमारास घडली. 

याबाबत पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रामकुंड ता. भुम येथील रामकवर मुरलीधर हाके वय 46 वर्ष या आजारी महिलेस उपाचारासाठी बार्शी येथे राञी आठ वाजण्याच्या सुमारास क्रुझर जीप क्रं. एम. एच. 25 ए. एल. 8886 यामधुन घेऊन जात होते. ही क्रुझर गाडी पार्डी फाट्याजवळ सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे चालकाचा जीपवरील ताबा सुटून जीप महामार्गाच्या लगत असलेल्या खड्यात जाऊन पलटी झाली. या अपघातात आजारी महिलेसोबत जात असलेल्या सुनिता आप्पासाहेब खांडेकर वय 51 वर्ष या गंभीर जखमी झाल्या. तर सोबत असलेले महादेव मुरलीधर हाके वय 25 वर्ष, प्रभाकर आप्पासाहेब खांडेकर वय 25 वर्ष, आजारी महिला रामकवर मुरलीधर हाके वय 46 वर्ष हे किरकोळ जखमी झाले. अपघातानतंर महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांनी थांबून जखमीना अपघातग्रस्त गाडीतुन बाहेर काढून उपचारासाठी बार्शी येथील रूग्णालयात पाठवण्यात आले. मात्र डॉक्टरांनी सुनिता खांडेकर यांना मृत घोषीत केले. सदर अपघाताची वाशी पोलीसात नोंद करण्यात आली असून पोहेका बाळासाहेब औताडे हे पुढील तपास करीत आहेत.

 
Top