भूम (प्रतिनिधी)-  धाराशिव येथील महसूल मधील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल झाला. त्यामुळे भूम तहसील मधील अधिकारी व कर्मचारी यांनी सहा दिवसापासून काम बंद आंदोलन चालू होते. आंदोलनानंतर सहा दिवसापासून विद्यार्थी व पालक तसेच सर्वसामान्यांना तहसीलमध्ये कर्मचाऱ्यांचा संप असल्यामुळे कागदपत्र मिळत नव्हती. परंतु शुक्रवारी महसूल संघटनेने आंदोलन स्थगित केल्यामुळे विद्यार्थ्यांसह सर्वांना दिलासा मिळाला आहे.

स्वराज्य संघटनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. त्यामध्ये लवकरात लवकर महसूल कर्मचाऱ्यांचा प्रश्न सरकारने मार्गी लावावा. आणि सध्या दहावी बारावीचे निकाल लागलेले आहेत. विद्यार्थ्यांना ऍडमिशन साठी कागदपत्राची आवश्यकता आहे. लवकरात लवकर प्रमाणपत्र देण्यास चालू करावे अशी मागणी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार आरडीसी यांना केली. तहसीलदार यांच्याकडून तात्काळ प्रमाणपत्र वितरित व देण्यास चालू केले होते. सदर आंदोलनावेळी ॲड. विलास पवार, स्वराज्याची सरचिटणीस प्रा. वीर, स्वराज्य प्रवक्ते प्रा. गायकवाड, गणेश नलवडे, बप्पा मस्कर, सचिन माळी व शंभर ते सव्वाशे पालक विद्यार्थी उपस्थित होते.

 
Top