धाराशिव (प्रतिनिधी)- परंडा तालुक्यातील अंबी पोलिस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी करून वाहनाची तपासणी करीत असताना  42 जिंवत वासरे व 8 मयत वासरासह एकूण 6 लाख रूपये किंमतीचा माल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी गोवंशीय वासरांची कत्तलीसाठी वाहतूक करणाऱ्याविरूध्द गुन्हा नोंद केला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, अंबी पोलीस ठाणे हद्दीत कोंबीग ऑपरेशन व नाकाबंदी दरम्यान वाहने चेक करत असताना इनगोंदा रोडने एक अशोक लिलन्ड 1415 छोटा दोस्त कंपनीचा बदामी रंगाचा टेम्पो क्र एमएच 42 बीएफ 1665 असा येत असताना पोलीस पथकास दिसला. पोलीस पथकाने सदर वाहनास हात करुन थांबवला. सदरील अशोक लिलॅड टॅम्पोची पथकाने पाहणी केली. त्यामध्ये गोवंशीय जातीचे वासरे दिसुन आले. सदरील वाहन चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नावे शारंख दस्तगीर शेख, वय 28 वर्षे, रा. भिगवन ता. इंदापूर जि. पुणे, सद्दाम ईक्बाल शेख, वय 30 वर्षे, रा. भिगवन, ता. इंदापुर जि. पुणे अशी सागिंतले.  अशोक लिलॅड टॅम्पोमध्ये गोवंशीय 42 जिवंत वासरे व 08 मयत वासरेसह वाहन असा एकुण 6 लाख रूपये किंमतीचे वासरे व वाहन मिळून आले. सदरील गोवंशीय वासरांना वाहनांमध्ये दाटीवाटीने भरण्यात आले होते. या गोवंशीय वासरांना गाडीमध्ये हालचाल करण्यासाठी पर्याप्त जागा नव्हती. अत्यंत त्रासदायक पध्दतीने दाटीवाटीने भरुन अवैध रित्या कत्तल करणेसाठी त्यांची वाहतुक करण्यात येत होती. त्यावरुन पथकाने नमुद आरोपीविरुध्द पोलीस ठाणे अंबी येथे महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1995 चे कलम 5(अ)(1), 9(ब), प्राण्याच्या निर्दयतेने वागविण्यात प्रतिबंध कायदा 1960 कलम 11 (1) (ड) (ई) (एच) कलम 6, महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1976 सह मोवाका कलम 192 (अ)  सह कलम 34 अन्वये गुन्हा नोदंवला आहे.

जिल्हा  पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक  गौहर हसन, गौरीप्रसाद हिरेमठ उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग भुम यांच्या मार्गदर्शनाखाली अंबी  पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खरड, सपोफौ शेख, पोहेकॉ शेंडगे, भोसले, पोकॉ सोनटक्के, चौगुले, चालक डमाळे यांचे पथकांनी ही कारवाई केली.

 
Top