भूम (प्रतिनिधी) -भूम न. प. ने बांधलेल्या शहरातील छत्रपती संभाजी महाराज कॉम्प्लेक्स मधील पायऱ्यावरून पाय घसरून जवळपास पंधरा फूट खाली पडल्याने हिराबाई पोत्रे या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या कॉम्प्लेक्समध्ये ग्रील न बसविल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.

गुरुवार दिनांक 6 जून रोजी भूम येथील छत्रपती संभाजी महाराज कॉम्प्लेक्स या इमारतीच्या पायऱ्यावरून पाय घसरून पंधरा फूट खाली पडल्याने हिराबाई पोत्रे वय (65) या महिलेचा धाराशिव येथे रुग्णालयात उपचार दरम्यान मृत्यू झाला. पायऱ्यांवरून खाली कोसळल्याचे कळतात शॉपिंग मधील पाच तरुणांनी लगेच महिलेस शॉपिंग सेंटरच्याच पाठीमागे असलेल्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले ग्रामीण रुग्णालयातील डॉ. शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी लगोलग प्रथमोपचार केलेफ परंतु सदरील महिलेला गंभीर मार लागल्याने पुढील उपचारासाठी धाराशिवला हलवण्यात आले. अखेर उपचारादरम्यान त्यांचे दुःखद निधन झाले.

भूम येथे नगरपरिषदेने बांधलेल्या कॉम्प्लेक्समध्ये जाताना महिला ग्रील नसल्याने खाली पडली. भूम ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना धाराशिव येथे उपचारासाठी दाखल केले होते. उपचारा दरम्यान महिलेचा मृत्यू झाला. या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या नगरपरिषद  मुख्याधिकारी, नगर अभियंता, कंत्राटदारावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी सर्वपक्षीयांच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.


शहरातील सर्वच शॉपिंग सेंटर अतिक्रमणाच्या व अस्वच्छतेच्या विळख्यात

शहरात कोट्यवधी रुपये खर्च करून नवीन शॉपिंग सेंटर बांधण्यात आले असून सर्वच शॉपिंग सेंटरमध्ये पाण्याची सोय नसल्याने प्रसाधन गृहे बंद आहेत. दिव्यांगासाठी प्रसाधनगृहाची सोय नाही. पायऱ्या चढून जाण्यासाठी रेलींग व कठडे नसल्याने दिव्यांगांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सोबतच या भागात अतिक्रमणे वाढली असून त्या अतिक्रमणामुळे अस्वच्छता देखील वाढली आहे. याबाबत सर्वपक्षीय यांनी वारंवार निवेदन देखील नगर परिषदेकडून कुठल्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही.

 
Top