धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव जिल्ह्यात कृषी विभागाची 19 दुकानावर मोठी कारवाई केली आहे. 6 कृषी दुकानाचे परवाने कायमस्वरूपी रद्द केले आहेत. तर 12 दुकानाचे परवाने निलंबित व 5 केंद्राना सक्तीची ताकीत दिली आहे. नियमित तपासणीत अनियमितता, त्रुटी सापडून आल्याने जिल्हा कृषी अधीक्षक रविंद्र माने यांनी ही कारवाई केली आहे. साठा न जुळणे, पॉज मशीन न ठेवणे, शेतकऱ्यांना पावती न देणे यासह अन्य त्रुटी असल्याने कारवाई करण्यात आली आहे.

यामध्ये कळंब व लोहारा तालुक्यातील प्रत्येकी तीन-तीन कृषी सेवा केंद्र परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत. भूम तालुक्यातील 17, धाराशिव तालुक्यातील 4, तुळजापूर तालुक्यातील 1, कळंब शहरातील 2 कृषी सेवा केंद्र परवाने निलंबित केले आहेत. तर धाराशिव तालुक्यातील 2, परंडा, तुळजापूर, वाशी तालुक्यातील 1 कृषी सेवा केंद्र परवानाधारकांना ताकीत दिली आहे. असे एकूण 35 परवान्यांवर कारवाई करण्यात आली आहे. 


 
Top