कळंब (प्रतिनिधी)-केज तालुक्यातील साळेगाव कडून कळंब कडे कत्तलीसाठी  गोवंशाची वाहतूक होणार असल्याची माहिती गोरक्षक दिनेश धनके यांना मिळाल्यानंतर सदरची माहिती कळंब पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक रवी सानप यांना  कळवल्या ने तात्काळ त्याठिकाणी कळंब पोलीस स्टेशन मधील कर्मचारी यांनी वाहन ताब्यात घेवुन कायदेशीर कारवाई  करून तीन गाई ताब्यात  घेवून कळंब येथील श्री स्वामी समर्थ गो शाळा येथे सुखरूप सोडण्यात आल्या.

हे वाहन कळंब मार्गे जात असताना काही वेळातच ताब्यात घेतले  व त्याची चौकशी केली असता तीन गोवंश  कत्तलीसाठी घेऊन जात आहे,. असे निदर्शनास येताच  वाहन पोलीस स्टेशन कळंब येथे दाखल करून वाहन चालकावर गोहत्या प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. व सदर गोवंश श्री स्वामी समर्थ गोशाळा कळंब येथे सुखरूप सोडण्यात आले. गोशाळेमध्ये गोवंश वाढत असून चाऱ्यासाठी दानशूर व्यक्तींनी मदत करावी असे आवाहन श्री स्वामी समर्थ गोशाळेचे व्यवस्थापक गणेश सदाफुले यांनी केले आहे. या गो शाळेत साठ ते सत्तर  गोवंश आहेत.

 
Top