धाराशिव (प्रतिनिधी)- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची मतमोजणी प्रक्रिया शांततेत व भयमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी 4 जून रोजी मतमोजणीच्या दिवशी जिल्ह्यातील सर्व घाऊक मद्य विक्री,सर्व किरकोळ मद्यविक्री आणि ताडी विक्रीची परवानाधारक दुकाने मतमोजणी पूर्ण होईपर्यंत आणि निकाल जाहीर होईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी दिले आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या परवानाधारकाविरुध्द दारूबंदी कायदयातील तरतुदीनुसार कठोर कारवाई करण्यात येईल असे या आदेशात नमूद केले आहे.

 
Top