कळंब (प्रतिनिधी)-27 जून पासून एसटी महामंडळाचा कर्मचारी सच्चिदानंद अशोक पूरी दूरध्वनी केंद्राच्या (टेलिफोन) टॉवरवर अंदाजे 250 फूट उंचीवर जावून 7 व्या वेतन आयोग मागणीसाठी आंदोलनासाठी बसले आहेत. आंदोलनाचा तिसरा दिवस असल्याने सरकारने कोणतीही दखल घेतली नसल्याने धाराशिव-कळंब विधासनसभेचे आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेत पुरी यांच्या आंदोलनाची दखल घेवून त्यांची मागणी पूर्ण करावी अशी मागणी केली.

गेल्या तीन दिवसापासून प्रशासकीय पातळीवर सच्चिदानंद अशोक पूरी यांचे आंदोलन थांबविण्यासाठी प्रयत्न चालू होते. परंतु यात कोणतेही यश आले नाही. पुरी यांचे वडील, पत्नी व मुलगी यांनीही आंदोलनस्थळी ठिय्या मांडला आहे. पुरी यांच्या पत्नीने गेल्या तीन वर्षापासून एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. तेव्हापासून आम्हाला त्रास होत आहे. आपल्या पतीची मागणी पूर्ण करून सुखरूप घरी यावे असे माध्यमांशी बोलताना सांगितले. तर पुरी यांच्या वडिलांनी एसटी महामंडळ चालक-वाहक यांना भंगार गाड्या देत असून, यामुळे प्रवाशांच्या जीवला धोका निर्माण होत आहे. त्याप्रमाणे सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी केली आहे. सच्चिदानंद अशोक पूरी टॉवरवरून खाली आल्याशिवाय एकही बस चालू करणार नसल्याचा निर्धार कळंब आगारातील कर्मचाऱ्यांनी केला. मांडलेल्या अर्थ संकल्पात महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी काहीच घोषणा नाही असे सांगितले. 
Top