परंडा (प्रतिनिधी) - रंजल्या गांजल्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून बळ देणारे 'नेतृत्व' सामान्य कार्यकर्त्याशी नाळ जोडलेले 'लोकनेते' केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूरसाहेब यांनी संपर्क कार्यालय, परंडा येथे प्रतिमेचे पूजन अभिवादन केले.

यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस विकास कुलकर्णी, युवा नेते समरजितसिंह ठाकूर, तालुका कोषाध्यक्ष परसराम कोळी, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अरविंद रगडे, उमाकांत गोरे, ता. चिटणीस ॲड. संदिप शेळके, मिलिंद शिंदे, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस रामकृष्ण घोडके, युवा मोर्चा परंडा शहर उपाध्यक्ष धनंजय काळे, मनोहर पवार, युवा मोर्चा शहर चिटणीस गौरव पाटील, महिला मोर्चा शहराध्यक्ष सौ. ज्योतीताई भातलवंडे, परंडा विधानसभा महिला प्रमुख सौ. शुभदा शेलार, सोशल मीडिया तालुका संयोजक सिध्दीक हन्नुरे तसेच इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top