कळंब (प्रतिनिधी)-कळंब येथे माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री, महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. 

या प्रसंगी प्रतिमा पुजन प्रसिद्ध हृदय रोग तज्ञ डॉ.एल.जी.जाधवर, ॲड.शिवप्रसाद जाधवर हायकोर्ट छत्रपती संभाजीनगर, भारतीय जनता पक्षाचे कळंब तालुका सरचिटणीस  माणिक बोंदर, मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड यांच्या हस्ते करण्यात आले.लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या आठवणीला राजेंद्र बिक्कड यांनी उजाळा दिला. कार्यक्रमाचे प्रस्तावित प्रकाश पाळवदे, सुत्रसंचलन बाबासाहेब सारुक व आभारप्रदर्शन रेणुका फाउंडेशन चे संचालक शरद जाधवर यांनी केले.कार्यक्रमास डॉ . भगवंत जाधवर,दलुचंद बोंदर,सायस जाधवर, बन्सी मोराळे,लालासाहेब बुधवंत,चंदा चाटे, इत्यादी मान्यवर  उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पिनु जाधवर , सुजित सोनवणे, आकाश बोंदर,अभिमान तांबडे यांनी परिश्रम घेतले.

 
Top