धाराशिव (प्रतिनिधी)-  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापनेला 25 वर्षे पुर्ण झाली असून देशाचे नेते शरदचंद्र पवार यांनी 10 जून 1999 रोजी स्थापन केला. गेल्या 25 वर्षामध्ये देश व राज्य पातळीवर पक्षाने विविध क्षेत्रामध्ये उल्लखनिय कामगिरी केली. आज 26 व्या वर्धापन दिनानिमित्त धाराशिव येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट कार्यालयात राष्ट्रवादी नेते संजय निंबाळकर यांच्या हस्ते महात्मा गांधी व कै .यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पक्षाच्या झेंडावंदन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर हे होते.

याप्रसंगी उपस्थितांना संजय निंबाळकर यांनी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देत पक्षाचे नेते शरद पवार यांच्याकडून प्रेरणा घेवून पक्षवाढीसाठी काम करण्याचे आवाहन केले. तर संजय पाटील दुधगावकर यांनी देशाचे नेते शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, खा. संसदरत्न सुप्रिया सुळे, खा. अमोल कोल्हे यांच्यासारखी दिग्गज मंडळी आपल्या कामाचा प्रभाव देश व राज्य पातळीवर दाखवत असताना नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणूकीत पक्षाने दहापैकी आठ जागा जिंकून सामान्य माणसासाठी पक्ष उपयोगाला येत आहे. हे मतदानातून सिध्द केले आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील पक्ष वाढीसाठी महिला, युवक, शेतकरी, कामगार, मागास, अल्पसंख्यांकाच्या प्रश्नाला यापुढील काळात न्याय मिळण्यासाठीच्या लढाईत आपआपले योगदान द्यावे, व हिरहिरीने सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.

यावेळी भालचंद्र बिराजदार, मुस्ताक हुसेनी, नरदेव कदम, सुरेश टेकाळे, विठ्ठल माने, बालाजी डोंगे, मनोहर हारकर, डॉ. मोहन बाबरे, डॉ. सिद्दाप्पा ताडेकर, सुदन पाटील, ॲड. प्रविण शिंदे, अमर गुंड, रणवीर इंगळे, अनिल जाधव, इकबाल पटेल, रमाकांत हजारे, भारत शिंदे, सागर चिंचकर, बालाजी तांबे, निलेश काकडे, राजेंद्र मोरे, दिलीप परिट, गणपत चव्हाण, नानासाहेब हंगे, नामदेव चव्हाण, पांडूरंग थोरात, महादेव थोरात, मारुती गरड, जीवनराव बर्डे, बाळासाहेब कणसे, इम्रान पठाण, सरदार पटेल, मदन पाटील, अरुण जाधव, शौकत मुजावर आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार सुरेश टेकाळे यांनी केले.

 
Top