परंडा (प्रतिनिधी)- येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक राहुल बनसोडे यांना साई प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीने गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल मित्र परिवाराच्यावतीने  शिंगेवाडीचे सरपंच शिवाजी  सोनवणे यांच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी कपिलापुरीचे मनोज पिंपरकर, कौडगावचे तानाजी ठवरे, खासगाव ग्रा.पं.सदस्य महादेव सातपुते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक सेलचे जिल्हा नेते गनी भाई हावरे, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे नेते नंदु शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते खय्युंम भाई तुटके, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा सरचिटणीस घनश्याम शिंदे, डोमगाव चे बबन काळे, खासापुरी चे बाप्पा देशमुख, हारून कुरेशी, देवा बनसोडे आदी उपस्थित होते.

 
Top