उमरगा (प्रतिनिधी)- इतिहासात पराक्रमी राज्यकर्ती म्हणून परिचित असलेल्या अहिल्यादेवी विलक्षण प्रतिभेच्या धनी होत्या. बालवयात धैर्य, साहस, प्रेम, करुणा या आदी गुणांनी परिपूर्ण होत्या. असे प्रतिपादन विजयाताई सोनकाटे यांनी केले.

शहरातील अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्यावतीने अहिल्यादेवी होळकर यांच्या 299 व्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी सकाळी आठ वाजता देवघर समाज मंदिरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे पुतळा पूजनानंतर अहिल्यादेवी होळकर चौकात पोलीस निरीक्षक डी. बी. पारेकर, बळीराम सुरवसे यांचे हस्ते पूजनपूजन करण्यात आले. त्यावेळी सोनकाटे बोलत होत्या. यावेळी डॉ. दुधभाते, डॉ. घोडके आदी उपस्थित होते. यासाठी जालिंदर सोनटक्के, जयंती समितीचे अध्यक्ष गोपाळ घोडके, उपाध्यक्ष मारूती घोडके, सचिव अरूण गडदे,हिरालाल घोडके यासह जयंती समिती सदस्यासह महिला, युवती, नागरिक, समाजबांधव उपस्थित होते.अहिल्यादेवी होळकर, जय मल्हार च्या घोषणा देत युवक सहभागी झाले होते. सकाळी दहा वाजता एकुरगावाडी येथील श्री तुळजाभवानी आश्रमशाळेतील अनाथ, निराधाराना जेवण देण्यात आले. आजच्या शिकलेल्या तरुणांनी पुस्तकी ज्ञान व व्यवहार ज्ञानाचा समन्वय साधून समाजाच्याहितासाठी कार्य करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक पारेकर यांनी केले. जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात 31 जणांनी रक्तदान केले. 

 

श्री शिवशक्ती विद्यालयात जयंती साजरी

तालुक्यातील एकुरगा श्री शिवशक्ती विद्यालयात अहिल्यादेवी होळकर यांची जयंती विविध उपक्रम घेवून शुक्रवारी (31) साजरी करण्यात आली. ज्ञानविकास शिक्षण संस्थाध्यक्ष तथा मुख्याध्यापक प्रकाश बोंडगे अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्रा. विठ्ठल कुणाळे उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते अहिल्यादेवी यांच्या प्रतिमा पूजन करण्यात आले.श्री बोंडके यांनी अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन चरित्र सांगून राज्यकारभार कसा चालवावा हे अहिल्यादेवीच्या राज्यकारभारातून स्पष्ट होते. असे सांगितले. यावेळी सिद्धेश्वर वाकडे, राजेंद्र सगर, सोमनाथ म्हेत्रे, महादेव करके उपस्थित होते.


 
Top