धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,  अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली  धाराशिव जिल्ह्यातील एकुण 18 पोलीस ठाणे व इतर कार्यालय अंतर्गत अंमली पदार्थ विरोधी दिन अनुषंगाने शाळा, महाविद्यालय, व्यसन मुक्ती केंद्र या ठिकाणी पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी यांनी अंमली पदार्थाचे दुषपरिणाम याबाबत मार्गदर्शन करुन जनजागृती केली व शपथ घेण्यात आली. रेल्वे स्टेशन, बस स्थानक, मंदीर परीसर या ठिकणी अंमली पदार्थाचे बॅनर लावून व व्हॉटसअपद्वारे जनतेमध्ये जनजागृती केली. 

अंमली पदार्थ मध्ये कोकेण, ब्राउनशुगर, हेरोईन, चरस, गांजा, एम.डी.ए., एम.डी.एम.ए मेफेड्रोन याचा समावेश होतो. अंमली पदार्थाचे उत्पादान, विक्री, वाहतुक सेवणावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने 1985 साली गुंगीकारक पदार्थ व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ यांना प्रतिबंध करणारा कायदा अंमलात आणला. अंमली पदार्थाच्या सेवणामुळे मृत्यु श्वासाचा त्रास होणे, दात शिवशिवणे, शरीर थरथर कापणे इत्यादी गंभीर परिणाम माणासाचे शरीरावर होतात. काही अंमली पदार्थाचे रुग्ण आत्महत्येलाही प्रवृत्त होतात. तरुणांनी कॉलेज जिवनाचा आनंद घेणे, थ्रिल अनुभवने यासाठी अंमली पदार्थाचा अवलंब करु नये. अंमली पदार्थ सेवणा मुळे होणारे परिणाम हे सेवण करणाऱ्या व्यक्ती बरोबर त्याच्या कुंटूबातील प्रत्येक व्यक्तीला भोगावा लागतात. तर तरुणांनी व नागरिकांनी अंमली पदार्थाचे आहरी न जाता प्रत्येकांनी चांगल्या सवई अंगी कराव्यात. काही वेळा प्रलोभनामुळे तरुण पीढी अंमली पदार्थ घेण्याकडे वळते. त्यामुळे तरुणांचे व नागरिकांचे आयुष्य बरबाद होते. म्हणुन अशा धोकादायक अंमली पदार्थापासून सर्वांनी दुर राहावे. तुरुणांनी व्यायाम, क्रिडा क्षेत्र, वाचन याची आवड बाळगावी. अंमली पदार्थाचे विक्री बद्दल कोणतीही माहिती प्राप्त झाल्यास नजिकच्या पोलीस ठाण्यात कळविण्यात यावे. असे आवाहन जिल्हा  पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जनतेस केले.

 
Top