धाराशिव (प्रतिनिधी) -,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात हे पक्ष स्थापनेपासून (सन 2012) आजतागायत आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत युती करून अनेक निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या सोबत आहेत. सचिन खरात हे तरुण व धाडसी नेतृत्व असून त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवला आहे. म्हणून त्यांना राज्याच्या उच्च सभागृहामध्ये विधानपरिषदेवर घेऊन आमदार म्हणून निवड करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र देऊन मागणी केली आहे.

 
Top