भूम (प्रतिनिधी)- दहावी बारावीत यश मिळवलेल्या विद्यार्थी यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी नव्याने नोंदणीकृत आसलेल्या भूम तालुका पत्रकार संघ व डॉ. राहुल भिमराव घुले आरोग्य मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमानाने दि. 9 जून रविवारी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात गुणवंताच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन भूम तालुका पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीत आरोग्यदुत डॉ. राहुल घुले, गटशिक्षण अधिकारी राहुल भट्टी तर प्रमुख वक्ते म्हणून जेष्ठ पत्रकार संजय मिस्किन तसेच शिक्षण महर्षी आर. डी. सुळ, आर्दश शिक्षक भिमराव घुले व अमोल घुले हे उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन भूम तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय शेटे, उपाध्यक्ष अजित बागडे, सचिव गैस शेख, अरविंद शिंदे, सुनिलकुमार डुंगरवाल, अरुण देशमुख, प्रल्हाद अढागळे, शाम बागडे, उदय साबळे व अशिष बाबर यांनी केले आहे. यावेळी विद्यार्थी यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देवुन गैरविण्यात येणार आहे.