धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहरातील पुष्पक मंगल कार्यालय येथे काशीपीठ जगद्गुरू श्री श्री श्री 1008 डॉ.मलिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी,श्री.ष.ब्र 108 शंभूलिंग शिवाचार्य महाराज (मठ संस्थान अंबाजोगाई) यांच्या दिव्य सानिध्यात धाराशिव येथील पुष्पक मंगल कार्यालयात संपन्न झालेल्या लिंगायत समाजातील जाती व पोटजाती मधील वधू-वर व पालक परिचय मेळाव्यात उपस्थिताना आशीर्वचन पर मार्गदर्शन करताना जगद्गुरु म्हणाले की ,वधु वर पालक परिचय मेळावा ही काळाची गरज असून ,असे मेळावे  ई तर ठिकाणीही होत राहणे गरजेचे असून ,आपण आपली मुलगी देताना फक्त भौतिक सुख संपदा व नोकरीच न पाहता इतर गोष्टीचा ही विचार होणे गरजेचे आहे .तसेच आपला देश हा शेतीप्रधान देश असून, त्यांनी पिकवलेल्या धान्यामुळेच आपली गरज भासते आशा शेतकऱ्यांना कमी लेखने सुद्धा चुकीचे असून, दोन मुली पैकी एक मुलगी शेतकऱ्यांना द्या व दुसरी मुलगी तुमच्या अपेक्षित स्थळाला द्या तरच समाजातील वधू-वरांचा प्रश्न मिटेल. असे सांगून जगद्गुरु म्हणाले की ,वीरशैव लिंगायत समाज हा एका छताखालीच असून,  शाखा भेद नष्ट होणे ही सुद्धा काळाची गरज बनली आहे.आपण याचाही प्रामुख्याने विचार करून आपल्या धर्माचे कटाक्षाने पालन करावे .अशा प्रकारे जगद्गुरुंनी सविस्तर मार्गदर्शन केले.  

सदर मेळाव्यासाठी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून पालक ,वधू -वर मोठ्या संख्येने उपस्थित होते. अपंग, विधवा, विदुर, घटस्फोटीत तसेच शिक्षित, उच्चशिक्षित, व्यावसायिक, शेतकरी, काही वधू, व मोठ्या संख्येने वर व त्यांचे प्रतिनिधी यांचा परिचय स्टेज वरून झाला. मेळाव्यात  500 च्या जवळपास बायोडाटा जमा झाले . महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन झाल्यानंतर प्रस्तावना संयोजक विठ्ठल आप्पा खरे यांनी केले तसेच या प्रसंगी माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, शरण पाटील, शंभोलिंग शिवाचार्य स्वामीजी अंबाजोगाई यांनी आपले विचार व्यक्त केले.

या प्रसंगी हनुमंत भुसारे (व्हा.चेअरमन डॉ बाबासाहेब आंबेडकर कारखाना), गुरुनाथ बडूरे (राज्य संघटक लिं.सं.स.महाराष्ट्र), राजेंद्र आंबा मुंडे,(संचालक सिध्देश्वर बँक लातुर), श्रीकांत साखरे (चेअरमन बसवेश्वर पतसंस्था धाराशिव), रेवन सिद्धाप्पा लामतुरे (कृषी तज्ञ तेर), सातलिंग स्वामी, रवी कोरे आळनीकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन आकाशवाणी केंद्र उस्मानाबादचे निवेदक दौलत निपाणीकर यांनी केले. तर शेवटी मिळाव्याचे सह आयोजक राजेश बिराजदार यांच्यावतीने आभार मानण्यात आले.

 
Top