तेर (प्रतिनिधी)-सामाजिक दातृत्व असणे आवश्यक आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र संत विद्यालयाचे मुख्याध्यापक जे.के.बेदरे यांनी केले.

धाराशिव तालुक्यातील तेर येथील दत्तात्रय मुळे यांना नात झाल्याबद्दल तेर येथील महाराष्ट्र संत विद्यालयातील आठवी ते दहावी मधील मुलींना 200 पानाच्या एक डझन वहया वाटप प्रसंगी जे. के. बेदरे बोलत होते.यावेळी उषाताई मुळे, पर्यवेक्षक एस.एस.पाटील, नरहरी बडवे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी महाराष्ट्र संत विद्यालयातील आठवी ते दहावी मधिल 201 मुलींना सव्वा लाख रुपयांच्या वह्या रचना कन्स्ट्रक्शन लि.यांच्या वतीने वितरण करण्यात आल्या. यावेळी नरहरी बडवे, एल.टी.चव्हाण यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.यू. गोडगे यांनी केले. तर आभार एस.एस.बळवंतराव यांनी मानले.

 
Top