धाराशिव (प्रतिनिधी)- वडीगोद्री व पुण्यात चालू असलेल्या ओबीसी उपोषणाच्या आंदोलनाची दाहकता एवढी वाढली आहे. हे लोण आता ग्रामीण भागात गावागावात पाहायला मिळत आहे. धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गोविंदपूर येथे प्रा.लक्ष्मण हाके व पुण्यातील मंगेश ससाणे यांना पाठिंबा देण्यासाठी गोविंदपूर येथील ओबीसी बांधव शंकरराव कराड व नानासाहेब मुंडे यांनी उपोषण चालू केले. त्यांचा आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे. त्यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी धाराशिव येथील ओबीसी नेते धनंजय शिंगाडे व त्यांचे सहकारी यांनी भेट दिली. 

भेटी दरम्यान त्यांनी उपोषणकर्ते यांना जिल्ह्याचे शासनाचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे  यांना कॉल करून बोलणे करून दिले. तसेंच ओबीसी नेते शब्बीर अन्सारी व कल्याणराव दळे यांनाही कॉल लावून बोलणे करून देऊन त्याच्या तब्येतीची विचारपूस केली. धनंजय शिंगाडे यांच्या सोबत  कोळी समाजाचे ज्ञानेश्वर कोळी, नाभिक समाजाचे लक्ष्मण माने,हिंगुलांबिका सा.सेवा संस्थेचे अध्यक्ष मिलींद चांडगे, भावसार,गोसावी समाजाचे आभिजित गिरी,वंजारी समाजाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग लाटे, बाबासाहेब मुंडे, नवनाथ जाधवर, पांडुरंग डोलारे, विजयकुमार बोंदर, चंद्रकांत मुंडे, सीताराम सुरवसे प्रवीण पौळ यांच्यासह ओबीसी बांधव उपस्तीथ होते.

 
Top