उमरगा (प्रतिनिधी)- लाठी असोसिएशन महाराष्ट्र व उस्मानाबाद जिल्हा लाठी असोसिएशनच्या वतीने शुक्रवारी (ता.31) रोजी तुळजाभवानी क्रिडा संकुल येथे आयोजित दोन तास 30 मिनीटे लाठी- काठी फिरविण्याचा जागतीक विक्रमाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. यात  प्रथमेश मुर्गे,  प्रणव कदम, समृद्धी दवणे, तृप्ती पाटील व अंकिता साळुंखे- पाटील या खेळाडूंनी सलग 2 तास व साहिल शेख, याने सलग 2 तास 30 मिनीटे लाठी फिरवुन ऑरेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मलेशिया व ग्रीन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये विक्रमाची नोंद केली. 

याप्रसंगी ऑरेंज वर्ल्ड रेकॉर्ड मलेशियाचे प्रतिनिधी टी. मदन कुमार, लाठी इंडिया ऑर्गनायझेशनचे उपाध्यक्ष सविता व्हंडरे, दांडपट्टा असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष शिवराम भोसले, लाठी असोसिएशन महाराष्ट्रचे अध्यक्ष प्रा. युसुफ मुल्ला, उस्मानाबादचे क्रीडा अधिकारी भैरवनाथ नाईकवाडे, अभिजीत लोभे पालक प्रतिनिधी, रत्नागिरी लाठी असोसिएशनचे सचिव सुरेंद्र शिंदे, एशियन निर्णायक असोसिएशनचे जिल्हा सचिव अश्विन कडलास्कर, संयोजक कमिटीचे ओम सूर्यवंशी, आदिनाथ गोरे, लाठी  इंडिया ऑर्गनायझेशनचे संचालक महमदरफी शेख, सहारा फुटबॉल क्लब उस्मानाबादचे अध्यक्ष जावेद शेख, वीर कराटे मार्शल आर्ट नांदेडचे अध्यक्ष मनोज पतंगे यांची यावेळी उपस्थिती होती. रेकॉर्ड नोंद झाल्यानंतर ऑरेंज वर्ल्ड रेकॉर्डचे चीफ एडिटर टी. मदन कुमार यांच्या हस्ते खेळाडूंना रेकॉर्ड नोंद झाल्याचे सन्मान पत्र मान्यवरांच्या उपस्थितीत देऊन गौरव करण्यात आले. गौतम विधाते, सोमनाथ कुसळकर, शिराज शेख व अजिंक्य बिराजदार यांनी परिश्रम घेतले.

 
Top