धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील एकूण 57 महसूल मंडळापैकी ज्या 25 महसूल मंडळात 25 टक्केपेक्षा कमी बाधित क्षेत्र दिसून आलेले आहेत. अशा महसूल मंडळातील नुकसानीच्या पूर्वसूचना दिलेल्या शेतकऱ्यांना विमा कंपनीमार्फत विमा भरपाई रक्कम वितरित करण्यात येत आहे. खरीप हंगाम 2023 मध्ये जिल्ह्यातील सोयाबीन पीक विमाधारक शेतकऱ्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत पावसाचे पाणी  साचून पिकाचे नुकसान झाल्यामुळे नुकसानीच्या पूर्व सूचना दिलेल्या होत्या.अशा शेतकऱ्यांची संयुक्त पंचनामे विमा कंपनी व कृषी विभागाचे कर्मचारी यांच्यामार्फत करण्यात आले होते. उर्वरित 32 महसूल मंडळासाठी जुन्या सूत्राचा वापर करून विमा भरपाई वितरित करण्याबाबत पाठपुरावा करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,धाराशिव यांनी दिली.

उर्वरित 32 महसूल मंडळात 25 टक्केपेक्षा जास्त बाधित क्षेत्र असल्यामुळे नमुना सर्वेक्षणाच्या आधारे व योजनेच्या नवीन सूत्रानुसार विमा भरपाई रक्कम व परिगणना करण्याच्या सूचना आहेत. परंतु योजनेच्या नवीन सूत्रानुसार विमा भरपाई रक्कम परिगणित न करता पूर्वीच्या सूत्रानुसारच विमा भरपाई रक्कम परिगणीत करणेबाबत जिल्हाधिकारी आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येत आहे.

 
Top