तुळजापूर (प्रतिनिधी)- नगररचनाकार तथा भुसंपादन विशेष अधिकारी केशव रामचंद्र जोशी यांनी सेवानिवृत्ती पुर्वीच स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतल्या बद्दल त्यांचा सोलापूर जिल्हासहाय्यक संचालक यांच्या हस्ते सन्मान करुन त्यांना निरोप देण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, प्रभारी सहाय्यक संचालक राजाभाऊ धनाडे अदि उपस्थितीत होते. केशव जोशी तुळजापूर येथील असुन त्यांचा सेवेचा आरंभ धाराशिव येथे सहाय्यक नगर रचनाकार म्हणून झाला. नंतर त्यांनी संभाजीनगर, सोलापूर येथे काम केले. सेवानिवृत्ती पुर्वी त्यांनी नगररचना तथा भूमीसंपादन विशेष अधिकारी या पदावर कार्यरत असताना सेवा निवृत्ति स्विकारली. या सोहळ्यास तुळजापूर, सोलापूर सह राज्यातील मिञ परिवार, नातेवाईक मोठ्या संखेने उपस्थितीत होते.


 
Top