उमरगा (प्रतिनिधी)- जागतिक डॉक्टर दिनाचे औचित्य साधुन उमरगा व लोहारा तालुक्यातील डॉक्टरांचा सन्मान व मधुमेह व आहार तज्ञ डॉ. जगन्नाथ दिक्षीत यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. 

आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या संकल्पनेतून डॉक्टर डे चे औचित्य साधून सोमवार (दि.01) सायंकाळी 06.30 वाजता उमरगा शहरातील कैलास शिंदे मंगल कार्यालयात उमरगा व लोहारा तालुक्यातील डॉक्टरांचा सन्मान, संवाद तसेच बदलत्या जिवनशैलीचे आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबाबत मधुमेह व आहात तज्ञ प्रोफेसर डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. जीवनशैलीच्या माध्यमातुन वजन कमी करणे व मधुमेहावर नियंत्रण कसे आणावे हे डॉ. दिक्षित सांगणार आहेत. आमदार ज्ञानराज चौगुले यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार प्रा.रविंद्र गायकवाड असणार आहेत. बाजार समितीचे माजी सभापती जितेंद्र शिंदे यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे. यावेळी युवा सेना विभागीय निरीक्षक किरण गायकवाड, माजी सभापती मोहयोददीन सुलतान, उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ.विनोद जाधव, आयएमएचे अध्यक्ष डॉ.अनंत मुगळे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केले आहे.

 
Top