कळंब (प्रतिनिधी)- निसर्ग प्रेमी वृक्ष लागवडीचे खुप आवड असलेले वृक्षांमधील विविध जातीचे अभ्यासु जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून कळंब पोलिस ठाणेच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत'अटल घन वन' योजनेअंतर्गत वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत लागवडी करिता जमीन तयार करण्याचे काम चालू आहे. या जागेवर सहा हजार देसी वृक्ष घन पद्धतीने लागवड करण्यात येणार आहे. 

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व विभागीय सामाजिक वनीकरण अधिकारी करे धाराशिव यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. या मोकळ्या जागेवर ऑक्सीजन हब वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम सुरू करण्यात येणार असून, यामध्ये सामाजिक वनीकरण व पोलीस विभागाची कर्मचारी सहभाग असणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन, कळंब पोलिस उपविभागीय अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस वृक्षप्रेमी निरीक्षक रवी सानप व कळंब सामाजिक वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष दोडके यांच्या देखरेखीखाली वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. यामुळे कळंबकर यांना ऑक्सीजन हब व वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम याचा फायदा होणार आहे. सध्या जमीन तयार करण्याचे काम चालू आहे. यावेळी कळंब पोलीस स्टेशनचे पोलीस  वृक्षप्रेमी पोलीस निरीक्षक रवी सानप, सामाजिक वनीकरण विभाग कळंब चे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष दोडके त्या विभागाचे वनपाल एस. आर. कुलकर्णी, संतोष टोणगे, पोलिस अंमलदार  शिवाजी राऊत, महादेव मुंडे, दत्तात्रय शिंदे, विजय मानखुळ,  महिला पोलीस कर्मचारी स्वाती कांबळे, संजीवनी वरडकर, कल्पना पत्तेवर हे कर्मचारी उपस्थित होते. 

 
Top