कळंब (प्रतिनिधी)-राजर्षी शाहू महाराज सामाजिक संस्था खोंदला आयोजित मी ज्ञानी होणार उपक्रमाचे दिनांक 26 जून राजर्षी शाहू महाराज जयंती पासून सुरुवात होते. विद्यार्थ्यांमध्ये लहान वयातच स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने राज्यभरातील 15 जिल्ह्यातील 150 शाळांमधून या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. यामध्ये नियमित समान्यज्ञानावर आधारित 5 प्रश्न सर्व शाळांना पुरविले जातात. प्रत्येक महिन्याला एक सराव चाचणीचे आयोजन केले जाते. 12 जानेवारीला जिजाऊ जयंतीच्या वेळेस शाळा स्तरावर अंतिम परीक्षेचे आयोजन केले जाते. यामध्ये प्रत्येक शाळेतून तीन क्रमांक काढले जातात. संस्थेमार्फत त्या तीन विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र दिले जाते.

12 जानेवारीच्या परीक्षेतून प्रत्येक शाळेतून तीन क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांची 25 फेब्रुवारी 2024 रोजी राज्यस्तरीय परीक्षा घेण्यात आली.12 जिल्ह्यातून या परीक्षेचे आयोजन करण्यात आले. या राज्यस्तरीय परिक्षेमधून मोठ्या गटातून 28 व लहान गटातून 9 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना संस्थेमार्फत 500 रूपये शिष्यवृत्ती व प्रमाणपत्र देण्यात येते.

धाराशिव जिल्ह्यातील मी ज्ञानी होणार स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिस वितरण करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य खाजगी क्लासेस संघटनेचे राज्यसचिव हनुमंत भोसले, थोरात, शरद चंद्रजी पवार विद्यालय खोंदलाच्या मुख्याध्यापिका धाबेकर, बिक्कड, भारत मोहिते, डांगरे, कस्पटे, मेदने, पवार, राजर्षी शाहू महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सचिन लांडगे,सदस्य नानासाहेब मुळीक,निलेश मुळीक उपस्थित होते.  

 
Top