कळंब (प्रतिनिधी)- कळंब पोलीस ठाणे वाहतूक शाखेच्यावतीने 190 वाहनांवर कारवाई केली. यावेळी मोटर सायकल परवाना नसलेले,ट्रिपल सीट, ओव्हरलोड तसेच अठरा वर्ष खालील मुलांना गाडी देणे. अशा विविध प्रकारचे 190 वाहनांवर खटले  एका महिन्यामध्ये दाखल केले. यावेळी एकूण 86 हजार 150 रूपये दंड केला.

सदर कार्यवाही ही धाराशिव पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या आदेशानुसार कळंब पोलिस उपविभागीय अधिकारी संजय पवार, कळंब पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक राम बहुरे व पोलीस हेड कॉन्स्टेबल मुंडे, रवी कोरे यांनी कार्यवाही केली आहे. शहरात तांदुळवाडी रोड, ढोकी रोडी, परळी रोड, कॉलेज परिसरात अनेक कोचिंग क्लासेस आहेत. क्लासेसला येणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थी व विद्यार्थिनी आप -आपल्या पालकांचे दुचाकी घेऊन येता. तसेच काही उनाड विद्यार्थी स्टंटबाजी करताना ही पाहिला मिळतात. याकडे ही कळंब वाहतूक शाखेच्यावतीने लक्ष ठेवून कार्यवाही करावी. अशी नागरिकांकडून भावना व्यक्त केल्या जात आहेत.


सर्व पालकांना कळंब पोलीस ठाणे वतीने आवाहन करण्यात येते की, आपल्या अल्पवयीन पाल्यांना दुचाकी किंवा चारचाकी चालवण्यास देऊ नये. अन्यथा शहरातील सर्व चौकामध्ये दररोज वाहन तपासणी करण्यात येत आहे. या दरम्यान अल्पवयीन पाल्य आढळून आल्यास दंड वसूल करण्यात येईल.

रवी सानप 

पोलीस निरीक्षक कळंब पोलिस ठाणे     

 
Top