परंडा (प्रतिनिधी)- परंडा तालुक्यातील अनाळा येथील कालिका ज्वेलर्सचे संचालक विनोद चिंतामणी यांची धाराशिव जिल्हा सराफ सुर्वणकार फेडरेशन जिल्हा कायदेशीर कार्यान्वित समितीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांना निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष दत्ता गोरे (माळी) यांनी धाराशिव येथे देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या निवडी बद्दल अनाळा ग्रामस्थाच्यावतीने समाजसेवक नानासाहेब अनाळकर, प्रा.विकास सरवदे, महाराष्ट्र ग्रामिण बँकेचे सोमनाथ गडकर, एम.बी.कबीर, अलिम शेख यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या निवडी बद्दल सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

 
Top