धाराशिव (प्रतिनिधी)-पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मोत्सवानिमित्त शुक्रवारी धाराशिव शहरात विविध मंडळांनी मिरवणुका काढल्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवींचरू सजविलेल्या आकर्षक मुर्ती व देखावे शहरवासियांचे लक्ष वेधून घेत होते. अहिल्यादेवींच्या जयघोषाने शहर दुमदुमन गेले होते. भंडाऱ्याची उधळण करीत डॉल्बीच्या तालावर तरूणाई थिरकत होती. 

सकाळी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरज सांळुके आदींनी अहिल्यादेवी होळकर चौकात अभिवादन केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवळी होळकर यांची जयंती शुक्रवारी विविध पक्ष, संघटनांच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त शहरातील विविध मार्गावर पिवळे पताके लावण्यात आले होते. चौकाचौकात मुर्ती व प्रतिमा स्थापना करण्यात आल्या होत्या. काही मंडळांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी पाच वाजता देवकते गल्ली येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक विजय चौक, नेहरू चौक मार्गे अहिल्यादेवी होळकर चौकात रात्री दाखल झाली. अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्यावतीने सांजा रोड येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली. 

यावेळी मध्यवर्ती अहिल्यादेवी होळकर महोत्सव समितीचे अध्यक्ष लिंबराज डुकरे, गणेश सोनटक्के, सचिन चौरे, गणेश एडके, शुभम शेंडगे, कैलास लवटे, साधन पडूलकर, महेश मोटे, संतोष डुकरे, संतोष वतने, प्रविण खांडेकर, अमोल मैदांड आदी उपस्थित होते.धनगरी ढोल नृत्यांनी वेधले लक्ष

सांजा येथून निघालेल्या मिरवणुकीत धनगरी वेशभूषा परिधान करून बांधवांनी धनगरी ढोल नृत्य सादर केले. शिवाय मिरवणुकीत बालवारकरी सहभागी झाले होते. मिरवणुकीच्या पुढे आकर्षक विद्युत रोषणाईच्या छत्र्याही लक्ष वेधून घेत होत्या. सायंकाळी 7.30 वाजता मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौकात आली. तेथून ती देशपांडे स्टँड आली. डॉल्बीच्या आवाजात भंडाऱ्याची उधळण करत तरूण बेभानपणे नाचत होते. नंतर रात्री ही मिरवणूक अहिल्यादेवी चौकात दाखल झाली. 


 
Top